प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची  माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.    

या कार्यकर्माचे  महाविद्यालयातील विध्यार्थी व शिक्षकांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले व महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी आपली  मनोगते  व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, लोकमान्य टिळकांचे समाजकार्य तसेच त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान अधोरेखित केले तसेच थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्यासंघर्षमय काळातील त्यांची कायदेभंगाची चळवळीतील सहभाग अश्या अनेक प्रमुख बाबींना उजाळा दिला , सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती  साजरीकरताना  प्राचार्या डॉ. प्रिया राव समवेत शिक्षक आणि विद्यार्थी