प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातविविध कार्यक्रमाचे आयोजन करून  गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

     महाविद्यालयातील पदवीच्या शेवटच्या वर्षातील  विद्यार्थ्यांनी या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्प व भेटवस्तू देऊन एक आगळा वेगळा सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी आपली  मनोगते  व्यक्त केली. यावेळी प्राचार्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत, जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित करत, गुरु – शिष्याची चालत आलेली परंपरा यावर विचार मांडले, सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया मध्ये  गुरुपोर्णिने निम्मित आयोजित कार्यक्रम प्रसंगी  प्राचार्या डॉ. प्रिया राव, प्रा. नचिकेत दिघे, प्रा संजय भवर, प्रा सुनयना विखे,प्रा रवींद्र जाधव आणि विद्यार्थी.