प्रवरा शैक्षणिक संकुलात ३ हजार २२४ विद्यार्थ्याना लसीकरण

लोकनेते पद्यभुषण डॉ .बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालया अंतर्गत ३ हजार २२४ विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण झाले आहे.   देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १५ वर्षापुढील विद्यार्थ्यांना  कोव्हीडची लस देण्याचा निर्णय घेतला.  १ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण देखिल सुरू झाले. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकनेते पद्‌मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण व्हावे यासाठी स्वता: कोव्हीड पॉझिटिव्ह असतांना देखिल आरोग्य यंत्रणा, शासकीय अधिकारी, संबंधीत प्राचार्य यांच्याशी  संपर्क साधून संस्थेच्या ४२ माध्यामिक आणि कनिष्ठ महाविद्यालययपैकी २० शाळा आणि महाविद्यालयातील ३ हजार २२४ विद्यार्थ्याना लसीकरण पुर्ण झाले आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकांना आव्हान केल्याने संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी लसीकरण अॅपवर नोंदणी करून मोठा प्रतिसाद देखिल दिला आहे. शाळा आणि स्थानिक स्कुल कमिटीव्दारे प्रत्येक विद्यार्थ्याचे शंभर टक्के लसिकरणांचे नियोजन आहे. मागील दोन दिवसात शाळा आणि महाविद्यालये राज्य सरकारने बंद केली असली तरी प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामार्फत  १५ वर्षापुढील सर्व विद्यार्थीना लस देण्याचे नियोजन संबंधीत शाळांनी केले आहे.