प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन आनंदाचे डोही आनंद तरंगं

 प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा ११ वा  वर्धापनदिन  ६ जुलै २०१९ रोजी मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. स्कूलचे माजी विद्यार्थी तांत्रिक अभियंता शशांक तांबे, चार्टड अकौंटंट अदित्य मानधने, उत्पादन अभियंता अमोल थोरात, आर्किटेक्ट प्रेरणा कटारिया हे प्रमुख पाहुणे लाभले. प्रमुख पाहुण्यांचा यथोचीत सन्मान प्राचार्यांच्या शुभहस्ते पार पडला तसेच दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मिठाई वाटपाने कार्यक्रम गोड झाला.  मुलींसाठी संगित खुर्ची, चेंडूफेक तर मुलांसाठी रस्सीखेच असे उपक्रम राबवले. सदर प्रसंगी स्कूलचे प्राचार्य श्री सुशील शिंदे, उपप्राचार्य हेमांगी कसरेकर, निमसे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.