प्रवरेची कावेरी संसारेची शूटिंग हॉलीबॉल वर्ल्ड कपसाठी निवड

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या एफ. वाय. बी.ए या वर्गातील विद्यार्थिनी कु. कावेरी बाळासाहेब संसारे या विद्यार्थिनीची शूटिंग हॉलीबॉल वर्ल्ड कप साठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. या स्पर्धा दिल्ली येथे होणार आहे. सदर वर्ल्डकप स्पर्धा यावर्षीपासूनच सुरू झालेली आहे. यामध्ये भारत ,पाकिस्तान ,बांगलादेश, नेपाळ, कॅनडा, न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया ,अफगाणिस्तान यासारखे १९ देश सहभागी आहेत. या विद्यार्थिनीने यापूर्वी जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कु.संसारे हिने यापूर्वी ४१ वी जूनियर नॅशनल शूटिंग बॉल चॅम्पियन २०२३ सवाई मानसिंग स्टेडियम ,जयपुर (राजस्थान) येथे सहभाग घेतला होता.तसेच आतापर्यंत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आहे. प्रवेरच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षणांसोबतचं संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी खेळासही महत्व दिले आहे शिवाय प्रत्येक शाळा महाविद्यालय क्रिडागंण प्रशिक्षिकत क्रिडा अधिकारी,खेळाचे साहीत्य त्याचबरोबर राज्य पातळी आणि देश पातळीवर पोहचण्यासाठी खेळाडूला विशेष प्रोत्साहन दिले जाते.