प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा भित्तीपत्रक स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले याने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारा  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रीसमीट – २०१९ स्पर्धेमध्ये मध्ये ‘चित्रम’ विभागातील ‘स्मार्ट फार्मिंग’ या विषयावर सादर केलेल्या  भित्तीपत्रकास भारतातून  प्रथम पारितोषिक मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी दिली.             

या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण ३८  भित्तीपत्रिकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये  लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून ५ विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.यामध्ये विक्रमसिंह पासले याला प्रथम क्रमांकाचे रु.३००० पारितोषिक व प्रशस्तीपत्रक मिळाले.या यशासाठी त्याला प्रा. महेश चंद्रे, प्रा.श्रद्धा रणपिसे,डॉ.अभिजीत दसपुते व प्रा.सारिका पुलाटे यांचे मार्गदर्शन लाभले तर सुप्रिया काळे,कोमल कुलत,धनश्री टेके व शिवांजली वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.या स्पर्धेतून मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतून शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील मुक्त ग्रंथालयास पुस्तके भेट देणार असल्याचे विक्रमसिंह पासले याने जाहीर केले.               

या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजीमंत्री  आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन : सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारा  आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रीसमीट – २०१९ स्पर्धेमध्ये मध्ये ‘चित्रम’ विभागातील ‘स्मार्ट फार्मिंग’ या विषयावर सादर केलेल्या  भित्तीपत्रकास-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील भारतातून  प्रथम पारितोषिक . मिळविलेला तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले.