प्रवरेच्या कृषी महाविद्यालयातील डेसी कोर्सच्या प्रशिक्षकांची डोंगरगण गावाच्या पाणलोट क्षेत्रास भेट

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद यांच्या सयुंक्त विद्यमाने लोणी येथे सुरु असलेल्या कृषी निविष्टा विक्रेत्यांकारीता कृषी पदविका (डेसी) या अभ्यासक्रमा अंतर्गत   नुकतीच मौजे डोंगरगण ता. नगर येथे प्रक्षेत्र भेट गावातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली असल्याची माहिती प्रा.निलेश दळे  दिली.

कृषी निविष्टा विक्रेत्यांकारीता आयोजित या भेटीचा मूळ उद्देश म्हणजे डोंगरगण गावात लोकसहभागातून पाणलोट क्षेत्रात झालेला बदल अभ्यासाने हा होता. या भेटीदरम्यान  डोंगरगण गावाचे सरपंच श्री कैलाश पठारे यांनी कृषी निविष्टा विक्रेत्यांना लोकसहभागातून गावामध्ये कशाप्रकारे विविध कामे करता येतात या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.या वेळीकृषी निविष्टा विक्रेत्यांनि गावातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.

सदर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद डेसी कोर्से समन्वयक श्री. महेश माने , कोर्सचे  समन्वयक प्रा. रमेश जाधवयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

फोटो कॅप्शन :-  लोणी येथील कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद यांच्या सयुंक्त विद्यमाने लोणी येथे सुरु असलेल्या कृषी निविष्टा विक्रेत्यांकारीता कृषी पदविका (डेसी) या अभ्यासक्रमा अंतर्गत   नुकतीच मौजे डोंगरगण ता. नगर येथे प्रक्षेत्र भेट गावातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन माहिती जाणून घेताना कृषी निविष्ठा विक्रेते आणि  शेतकरी