प्रवरेच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालायातील तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील नामांकित अशा विविधकृषी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहितीकृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषद, पुणे यांच्या द्वारे कृषीतील पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले असून त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आदी विद्यापीठामध्ये  प्रवेश मिळालेला आहे. या मध्ये अनिल भिटे , विनीत कोल्हे  व कु. दिशा चव्हाण  आदींचा समावेश होतो व त्यांना अनुक्रमे कृषी सूक्ष्मजीवशास्त्र, कृषीव्यवसाय व्यवस्थापन , काढणी पच्शात तंत्रज्ञान या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळणार आहे. या यशाबद्दल संथेचेअध्यक्ष श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील , संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत  थोरात , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील , कृषि संचालक डॉ.मधुकर खेतमाळस आदींनी अभिनंदन केले.