प्रवरेच्या विद्यार्थिनीची समर फेलोशिपसाठी मैसूर येथे निवड.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी कु. भावना बापू शिंदे हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उन्हाळी संशोधन फेलोशिप -२०२० योजनेअंतर्गत मैसूर येथील सेंट्रल फूड टेकनोलॉजिकल इन्स्टिट्यूट मैसूर, बँगलोर येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी कु. भावना शिंदे या विद्यार्थिनीला प्रति महिना दहा हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ फुड सायन्स येथील वैज्ञानिक डॉ. नांनजप्पा गणेश यांचे तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील व प्रथम वर्षांपासून महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका योजनेत काम करून शिक्षण घेणारी कु. भावना शिंदेच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थिनीला  प्रा. स्वरांजली गाढे, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. अमोल सावंत, प्रा. प्रविण गायकर, प्रा. श्रद्धा रणपिसे व प्रा. मिनल शेळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कु. भावना  शिंदे या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय  विखे पाटील, विश्वस्त श्री. आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहायक सचिव सौ. सुश्मिता माने, सहसचिव भारत घोगरे, आस्थापना प्रमुख डॉ. दिगंबर खर्डे, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. धनंजय आहेर, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.