प्रवरेच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये उत्तुंग यश

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेंअंतर्गत नुकत्याच प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेज मध्ये संपन्न झालेल्या औरंगाबाद येथील हर्मन फिनोकेम लिमिटेड या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये  ४६ मुलांची नोकरीसाठी निवड केली असल्याची माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.  

     हर्मन फिनोकेम लिमिटेड या कंपनीतर्फे कंपनीचे मिस. नीलांजन भट्टाचार्य एच. आर. ए. पी. आय., एच. आर. मिस. स्वाती थोरात व त्यांची टीम इंटरव्ह्यूसाठी आली होती. यावेळी संस्थेतर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. इंटरव्ह्यूसाठी ११८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी संस्थेत शिकत असलेल्या ४६ मुलांची निवड करण्यात आली आहे. ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती संपन्न झाल्या. .

     प्रा. धनंजय आहेर यांनी म्हणाली कि,  कि संस्थेचे अध्यक्ष.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मुलांच्या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तसेच मुलाखतीची तयारी करुन घेण्यावर भर असतो ज्यामुळे शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अधिक फायदा होत असतो. महाविद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरॊबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत.या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांनी सांगितले कि आतापर्यंत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहे व या पुढेही महाविद्यालय त्यासाठी काम करत राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेजचे सन २०१८-१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग व इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागाच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना  वेगवेगळ्या नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निकालापूर्वी नोकरी मिळाल्या आहे.
      वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.. राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा न. सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डो. सुजय  विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे  महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, रजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.