बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि शालेय वस्तूचे वाटप

भारताचे पाहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  जयंतीनिमित्त लोणी  येथील  कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाविद्यालयात आणि चंद्रापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे  मध्ये  सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि शालेय वस्तूचे वाटप करून बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती  प्राचार्य  ऋषिकेश औताडे  यांनी दिली.

कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या, राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर बालदिनाचे औचित्यसाधून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चंद्रापूर ता- राहाता येथे बालदिन साजरा केला आहे. त्याप्रसंगी मुख्याध्यापक  श्री.सत्यवान मेहरे यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शालेय साहित्य  आणि खाऊचे वाटप करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांनी मुलांसोबत आनंद साजरा केला. प्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्रा. अमोल सावंत, प्रा.महेश चन्द्रे, प्रा.स्वप्नील नलगे, प्रा.स्वरांजली गाढे, प्रा.मनीषा आदिक, जि.प.प्राथमिक शाळा चंद्रापूर येथील मुख्याध्यापक श्री.सत्यवान मेहरे, श्री.अनिल घोलप , श्री.बालाजी भोसले , श्रीमती. कहार , श्रीमती. भोसले , श्रीमती. मन्सुरी , श्री.अब्दुल जावेद  आणि इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थतीत होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच रासेयो चे सर्व स्वयंसेवक आणि प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वयंसेविका कु.प्रांजल साळुंके, सूत्र संचालन कु. भाग्यश्री नेहाकर आणि कु. रुचिका चौधरी, यांनी केले तर स्वयंसेविका  कु. निकिता जाधव हिने गीत गाऊन उपस्थतीतांची मने जिंकली.

फोटो  कॅप्शन:- लोणी येथील कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाविद्यालयात आणि चंद्रापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे  मध्ये भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  जयंतीनिमित्त बालदिन मान्यवर आणि विदयार्थी