महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार

लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली याचे कारण म्हणजे महाविद्यालयाला नुकताच
महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला या पुरस्काराबरोबरच रुपये एक लाखाचा धनादेश सन्मानचिन्ह महाविद्यालयास प्रदान करण्यात आले हा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी स्वीकारला. शासनाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी हा पुरस्कार महाविद्यालयास मोलाचा ठरणार आहे