युवकांनी आधुनिक शेतीचे नवे तंत्रज्ञान समजून घेत शेतीतून चांगले करीअर करावे विखे पाटील महाविद्यालयात आधुनिक शेती आणि युवक राज्यस्तरीय पाच दिवसीय शिबिर

युवकांनी आधुनिक शेतीचे नवे तंत्रज्ञान समजून घेत शेतीतूनही चांगले करीअर करता येऊ शकते. जे आपण पिकवितो ते आपल्याला विकता आले पाहीजे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या आधुनिक शेती आणि युवक या राज्यस्तरीय शिबीराच्या माध्यमातून मिळणा-या ज्ञानाचा उपयोग करुन कृषि उद्योजक व्हावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पद्‌मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय लोणी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आधुनिक शेती आणि युवक या अंतर्गत शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे देशाचा भाग्यविधाता या अंतर्गत पाच दिवसीय शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी सौ.विखे पाटील बोलत होत्या.यावेळी बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतांञिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, कॅम्पचे संचालक डॉ. राम पवार,कार्यक्रम समन्वयक डॉ बाळासाहेब मुंढे, उपप्राचार्य डॉ. बी. डी. रणपिसे, डॉ. ए. एस. वाबळे, डॉ. सी. एस. गलांडे आदीसह राज्यभरातून १६ विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात सौ.शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या, आजचे युवक हे शेतीकडे वळत नाहीत. यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. युवकांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान समजून घेत आरोग्यदायी शेती, प्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया यामाध्यमातून पुढे जाण्याची गरज आहे. शेती क्षेत्रात मोठी रोजगार निर्मीती शक्य आहे. असे सांगून मुलींनो शेतकरी मुले ही मोठे व्यवसायिक आहेत. तेव्हा आता शेतकरी नवरा नको गं बाई ऐवजी शेतकरी नवरा हवा गं बाई असे म्हणा शिबीरांतून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीत आणा असे सांगितले.

यावेळी शैलेश देशमुख म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषि धोरणामुळे आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, समूह शेतीला प्रोत्साहन दिले जाते. शेतीक्षेत्रात तरुणांना मोठी संधी असून रोजगार संधीही मोठी आहे. शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.