‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळा संप्पन

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि गीता परिवार संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळा संप्पन झाली असून यामध्ये  पहिल्या टप्प्यात संस्थेच्या बेचाळीस माध्यमिक शाळांमधील सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांचा.  अभ्यासासाठी उत्साह वाढून, बुध्यांक आणि गुणांक वाढविण्याच्या उद्देशाने, दैनंदिन योग साधना करून घेण्यासाठी सुमारे नव्वद क्रीडा शिक्षकांना या कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

       गीता परिवाराचे श्री दत्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रवरा महिला शिक्षण संकुलातील गंगुबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियम मध्ये संपन्न झालेल्या या ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळेचे उदघाट्न.  संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी  प्रवरा महिला शिक्षण संकुलाच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे, संस्थेचे क्रीडासंचालक प्रा. अफजल पटेल,डॉ. उत्तमराव अनाप,प्रा. राहुल काळे यांचेसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.   

       प्रा. दिगंबर खर्डे म्हणाले कि,  संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील  यांची असी संकल्पना होती कि, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिवसभर प्रफुल्लीत राहायचे असेल तर,योग साधना महत्वाची असून  खेळाच्या तासाप्रमाणेच  दैनंदिन परिपाठाच्या वेळेस विद्यार्थ्यांना योगसाधना देण्यात यावी त्या नुसार प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षक आणि एका शिक्षकांना गीता परिवारातील  योगा तज्ज्ञ प्रशिक्षकाद्वारे हे प्रशिक्षण देण्यात आले असून , आता या शिक्षकांकडून संस्थेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन योग् साधनादेण्यात येणार आहे.

       गीतापरिवाराचे श्री दत्ता सर म्हणाले कि, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग् दिवस साजरा केला जात असला तरी, योग् हि भारतीय कला आहे. डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गीता परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या योग्य साधनेद्वारे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बुध्यांक आणि गुणांक वाढल्याचे सांगताना स्वतः योगाचार्य रामदेवबाबा यांनी येथील  मुलांची योगसाधना बघून समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. 

चौकट :- * प्रशिक्षित ९० योग दूतांद्वारे संस्थेतील माध्यमिक विभागातील सुमारे २३ हजार  विद्यार्थ्यांना त्या त्या शाळेत परिपाठाच्या वेळी  दैनंदिन १५ मिनिटे संगीतावर आधारित योगसाधना.

*  वर्षाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचा  एकत्रित योग् साधना कार्यक्रम घेऊन चांगली योगसाधना करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार. इच्छुक ग्रामस्थांना हि  सहभागी करून घेण्यात येणार.

फोटो कॅप्शन :-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि गीता परिवार संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळेंच्या उदघाटन प्रसंगी  गीता परिवाराचे श्री दत्ता सर, संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे , सौ. लिलावती सरोदे, सं प्रा. अफजल पटेल,डॉ. उत्तमराव अनाप.