राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन  महाविद्यालययांच्या सयुंक्त विद्यमाने शिक्षण-संस्कार-आरोग्य-कृषी-स्वावलंबन आधारित ग्रामविकास आदींसह विविध उपक्रमाद्वारे  विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासावर भर असणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनातून गोगलगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न झाले असल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे संचालक श्री. सारंगधर दुशिंग, सरपंच सौ. संगीता माघाडे , उपसरपंच श्री. कैलास खाडे , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण-संस्कार-आरोग्य-कृषी-स्वावलंबन आधारित ग्रामविकास आदींसह विविध उपक्रमाद्वारे  विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासावर भर असणाऱ्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याख्याने, प्रात्यक्षिक व शिवार भेटी, सांस्कृतिक तसेच  व्यक्तिमत्व विकासाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मौजे गोगलगाव येथे स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, आरोग्य, मोबाईल दुष्परीणाम, नारी शक्ती इ. विषयी नागरिकांमध्ये  जनजागृती केली.  शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री. नामदेव पांढरकर,  माजी उपसरपंच श्री. बाळासाहेब धूळसुंदर, प्रा. रमेश जाधव मान्यवर उपस्थिती होते  शिबीर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी  प्रा. संदीप पठारे, प्रा.राहुल विखे आणि सर्व स्वयंसेवक इ. आदींनी परीश्रम घेतले.