लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घेतली तंबाखू मुक्तीची सामुहिक शपथ

लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याच्या मोहिमे अंतर्गत तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली.    

या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी व्यवसाय यावस्थापन महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.भाग्यश्री कोल्हे हिने सर्व  विध्यार्थ्यांना  सामूहिकरित्या तंबाखू मुक्तीची शपथ घालून दिली. 

कार्यक्रमात सहभागी झालेल्या  विद्यार्थ्यांना  तंबाखू मुक्ती संदर्भात जनजागृती करण्याच्या  हेतूने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल विखे यांनी  संबोधित केले. त्याच बरोबर तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारा एक लघुपट हि दाखविण्यात आला. या वेळी आपले मित्र, नातेवाईक व समाज यांनाही  तंबाखू सेवनापासून परावृत्त करण्याचा संकल्प सहभागी विद्यार्थानी केला.