विखे पाटील महाविद्यालयात खाद्य संस्कृती महोत्सवातून विद्यार्थ्यानी घेतले व्यावाहीक ज्ञान-….डॉ. प्रदीप दिघे

लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून वाणिज्य महोत्सल आयोजन करण्यात आले. त्यात विविध स्वरूपाचे ४० स्टॉल विद्यार्थ्यांनी थाटले. या स्टॉलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ५३ हजार रुपयांची कमाई केली. अवघ्या तीन तासांमध्ये खाद्य संस्कृती, कृषी संस्कृती, व्यापार व व्यवसाय तसेच इलेक्ट्रॉनिक साधने, फॅशनेबल ड्रेस, ज्ञान- विज्ञान व मनोरंजनपर उपक्रम याबरोबरच विविध स्टॉलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्केटिंग कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचे ज्ञान मिळाले. अतिशय कमी कालावधीमध्ये या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक आगळावेगळा उपक्रम यानिमित्ताने महाविद्यालय संपन्न झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.
वाणिज्य विभागाच्या वतीने झालेल्या या महोत्सवास संस्थेचे संचालक अण्णासाहेब भोसले,अलकाताई दिघे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे आदी उपस्थित होते. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ ज्वेलरी, फॅशनेबल कपडे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक वाहने यांचे स्टॉल अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने सजविले होते. महाविद्यालयात संपन्न झालेल्या या खाद्य संस्कृतीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. व यानिमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम सर्वांनीच अनुभवला. यासाठी वाणिज्य विभागातील डॉ. विजय खर्डे, डॉ. विजय निर्मळ, डॉ. विजय शिंदे प्रा. ताजने, प्रा. गोपाळे, प्रा. ठोके, प्रा.रंजना दिघे यांनी विशेष परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे प्राचार्य प्रदीप दिघे, उपप्राचार्य आर. जी.रसाळ, उपप्राचार्य वाबळे ए.एस. उपप्राचार्या छाया गलांडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनीही यासाठी विशेष परिश्रम घेतले.