विविध मंडळाची स्थापना

विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण,व्यक्तिमत्वविकास , भाषिक कौश्यल्य आणि संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विविध बहुआयामी मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगताना, या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठद्वारे  विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या नवनवीन प्रयोगांना चालना मिळून  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्स्वास निर्माण होईल असा विश्वास प्रवरा पब्लिक स्कुलचे संचालक कर्नल डॉ. के जगन्नाथन यांनी व्यक्त केला.        

कर्नल डॉ.के जगन्नाथन  आणि प्राचार्य सयाराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा पब्लिक स्कुलमध्ये चालू शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मध्ये असलेल्या संशोधकवृत्तीला चालना देण्यासाठी विविध मंडळाची स्थापना करण्यात आली. या उपक्रमा बद्दल  माहिती सांगताना  कर्नल के जगन्नाथन म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी  भाषा विकासासाठी “पब्लिक स्पिकिंग व ड्रायम्याटिक क्लब,मराठी नाट्य मंडळ,मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि त्यांच्यातील संशोधनवृत्ती विकसित  करण्यासाठी सायन्स क्लब,माहिती तंत्रज्ञानाच्या विविध कौशल्य विकासासाठी,टिंकरिंग क्लब,हस्तकला व शिल्पकला यांच्या धर्तीवर आर्ट-क्राप्ट  व पॉटरी क्लब,पक्षी निरीक्षण क्लब,विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी अस्ट्रलॉजी क्लब, संगीताची आवड जोपासण्यासाठीम्युझिक क्लब, गणितीय प्रक्रिया व वैदिक मॅथ्स सजवून घेण्यासाठी  मॅथ्स क्लब अस्या बहुआयामी मंडळांची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

 फोटो कॅप्शन :- स्थापनेतून सृजनशील विद्यार्थी घडविण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये स्थापन करण्यात आलेल्या  विविध मंडळामध्ये रमलेले विद्यार्थी