शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी मार्गदर्शन मिळेल – सौ. शालिनीताई विखे

कल्पकतेला महत्व देणारा पेटंट जगभर कायद्यांच्या स्वरूपात अस्तित्वात असून ग्रामीण भागातील शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी विश्वासार्ह मार्गदर्शन मिळेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील   (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य,अर्थशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पेटंट भरणे: प्रक्रिया व कायदेशीर पैलू” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सौ.शालिनीताई विखे बोलत होत्या.महाविद्यालयाच्या  प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोनई (नेवासा) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.एस. एल. लावरे,पुणे येथील  इंडिअन पेटंट एजंट. श्रीमती आशा गुरुळे. अकोले येथील अगस्ती महाविद्यलयातील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.एस. जी. वावले, आदी मान्यवर उपस्थित होते.   या वेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थी सुविधा केंद्राचे व पोस्टर प्रेसेंटेशनचे उद्घाटन करण्यात आले.

सौ विखे म्हणाल्याकी,  आज ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी पेटंट बद्दल माहिती मिळविणे व स्वतः पेटंटची नोंदणी करणे फार गरजेचे आहे. आजची कार्यशाळा त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे, कारण त्यांच्याकडे पेटंट कायद्यानुसार लागणारी बुद्धीमत्ता ही  कला आहे. पण त्याची नोंदणी कशी करावी  व बौद्धिक हक्क कसा  संपादन करावा याची  माहिती त्यांना मिळणार आहे .त्यामुळे ते आपली  शेती उत्पादने व फळावर प्रक्रिया करून आपली पेटंट नोंदणी करू शकतात . ग्रामीण भागात नवीन व्यवसाय करून रोजगार निर्माण करू शकतात.हे सांगून परिसरात बचत गटाच्या माध्यमातून कोणकोणते नवीन व्यवसाय यशस्वीपणे सुरु आहेत ते सांगितले आणि  हेच  पदमश्री व पद्मभूषण विखे पाटील यांचे स्वप्न आहे व ते आपले विद्यार्थीदेखील पेटंट नोंदणी करून पूर्ण करतील असा मला विश्वास सौ.शालिनीताई विखे पाटील यांनीव्यक्त केला.

उपस्थित मार्गदर्शकांनी पेटंट म्हणजे काय,त्याचा इतिहास ,भारतातील पेटंट कायदा ,कोणत्या बाबी पेटंट मध्ये येत नाहीत, कायद्यानुसार झालेल्या नवीन दुरुस्त्या ,पेटंट मिळवण्याची पद्धती ,पेटंटचा कालावधी,शोधकर्त्याला त्याचे मिळणारे फायदे व त्याच्या अधिकारावरील मर्यादा इ. बाबी प्रश्नउत्तराच्या मार्गाने शंकांचे निरसन करून सांगितल्या

सदर कार्यक्रमासाठी डॉ.सोमनाथ घोलप, प्रा.दिनकर घाणे, श्री महेंद्र तांबे  कार्यालय अधीक्षक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक यांनी परिश्रम घेतले,सदर कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी  ,विद्यार्थिनी बहुसंख्येने हजर होते .सूत्रसंचालन डॉ.अनंत केदारे आणि प्रा.सुसर यांनी तर उपप्राचार्य प्रा.दिपक घोलप यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन:- सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य,अर्थशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “पेटंट भरणे: प्रक्रिया व कायदेशीर पैलू” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ.शालिनीताई विखे ,सोनई (नेवासा) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.एस. एल. लावरे,पुणे येथील  इंडिअन पेटंट एजंट. श्रीमती आशा गुरुळे. अकोले येथील अगस्ती महाविद्यलयातील भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.एस. जी. वावले,महाविद्यालयाच्या  प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर आदी.