स्पर्धा परीक्षा पास होणे हे एक तंत्र – नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात

स्पर्धा परीक्षांसाठी घोकंपट्टी करण्यापेक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे अभ्यासाचे तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांना यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन, ग्रुप स्टडी, अवांतर वाचन व व्यक्तिमत्व विकास ह्या बाबींचा विद्यार्थ्यांनी अंतर्भाव करायला हवा असा मूलमंत्र नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी दिला.
           लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे,  कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, पॅक्स समन्वयक डॉ. शैलेश कवडे,प्राचार्य ऋषिकेश औताडे व प्राचार्य निलेश दळे उपस्थित होते, प्रास्ताविक कु. मोनिका आंधळे यांनी केले. 
     प्रशासकीय सेवेतील निवडीचे व  कामकाजाचे अनुभव  विद्यार्थ्यांसमोर मांडताना डॉ. यशवंत थोरात म्हणाले कि, परीक्षा पास झाल्यानंतरच्या मुलाखतीसाठी सामोरे जाताना समयसूचकता व हजरजबाबीपणा महत्वाचा असतो. मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणाऱ्याच्या हाती जर मुलाखत नियंत्रणाचे तंत्र असेल तोच यशस्वी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. प्रा.  रविंद काकडे यांनी आभार व्यक्त  केले.
फोटो कॅप्शन :-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या वतीने एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात.समवेत भारत घोगरे,  डॉ. अशोक कोल्हे,  डॉ. के. टी. व्ही रेड्डी,  प्रा. .दिगंबर खर्डे,  डॉ. मधुकर खेतमाळस,  डॉ. शैलेश कवडे,प्राचार्य ऋषिकेश औताडे व प्राचार्य निलेश दळे आदी. छाया..