१९१ विद्यार्थ्यांची इंडिगो व एजिल एअरलाईन्समध्ये निवड

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटीलप्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील एकूण ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती महाविद्यालयामध्ये इंडिगो एअरलाईन्सचे रिजनल मॅनेजर  विठ्ठल लबडे,  एजिल एअरलाईन्समुंबईचे मॅनेजर  आशिष अब्रहम, शिर्डी विमानतळ,  असि. एच. आर. बेंगलोर अरुणकुमार आणि रिजनल मॅनेजर,   हैद्राबाद कुमारसाहेब यांनी घेतल्या. या मुलाखातीमधून १९१ विद्यार्थ्यांची विमानतळावर बसचालक, लोडर व कार्यालयीन कर्मचारी म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विविध नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्हू आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून  इंडिगो एअरलाईन्स व एजिल एअरलाईन्स या हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्हूचे आयोजन केले होते. या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. सुरवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले.  या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल  संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व संस्थेच्या सर्व  संचालकांनी आणि पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.