सौ धनश्रीताई विखे पाटील-बातमी

भारताची चाळीस टक्के लोकसंख्या ही युवा असून या युवा शक्तीचा उपयोग भारत देशाच्या कल्याणासाठी व्हायचा असेल तर तो युवावर्ग सुदृढ असला पाहिजे म्हणूनच किशोरावस्थे मध्येच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळून आपले स्वास्थ्य जपावे असे प्रतिपादन ब्रिलियनबर्ड स्कुलच्या  संचालिका सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पदमभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून सौ  धनश्रीताई विखे पाटीलबोलत होत्या.या प्रसंगी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,  कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी  तसेच कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

सौ  धनश्रीताईंनी विखे पाटील यांनी प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतात सर्वाधिक दुर्लक्षित असलेला महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठयाप्रमाणात असून,साधारणतः बालव्यामध्ये भातुकलीच्या खेळात आघाडीवर असलेल्या मुली शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये संधी आणि सुविधा असूनही खेळाकडे दुर्लक्ष करतात.असे सांगताना परिवार आणि समाजामध्ये महिलेने सुदृढ राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी युवादशेमध्येच मुलींनी मैदानी खेळ खेळून आपले स्वास्थ्य जपताना शरीर सुदृढ व निरोगी ठेवले पाहिजे.मुलींनी आपल्या अभ्यासाबरोबच खेळात चांगल्याप्रकारे सहभाग घेतला पाहिजे व आपल्या देशाचे  तसेच आपल्या संस्थेचे नाव उंचावले पाहिजे,असे सांगताना केंद्र सरकारद्वारे सुदृढ भारत अभियान अंतर्गत असलेल्या वातावरणाची शुद्धता, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत योजना, परिसर स्वच्छता, माझी कन्या भाग्यश्री योजना इत्यादी मुद्द्यांचा सविस्तर उहापोह करताना. असे त्या म्हणाल्या. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ  धनश्रीताई विखे पाटील समवेत संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदी.