इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून प्रतिमापूजनासह विविध उपक्रम साजरे करण्यात आले. या वेळी इंदिरा गांधी यांच्या कार्याचे स्मरण करून  त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, दिपक विखे आत्माराम मुठे  आदी मान्यवर उपस्थित होते.

तर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने,तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी,फार्मसी संलग्नित महाविद्यालयामध्ये प्राचार्या डॉ. प्रिया राव,प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्य  डी. बी. थोरात,कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये कृषी संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन  महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर,कृषी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या अरुण थोरात,विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे,उपप्राचार्य डॉ. अण्णासाहेव तांबे,आर्किटेचरल महाविद्यालयाच्या प्राचार्या राजेश्वरी जगताप, प्रवरा पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल डॉ. के जगनाथन ,प्राचार्य सयाराम शेळके,प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्राचार्य  सुशील शिंदे, प्रवरा कन्या संकुलाच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्या सौ. संगिता देवकर, प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या प्राचार्या सौ. कुमकर, सैनिकी स्कुलचे संचाल कर्नल भरतकुमार, प्राचार्य सुधीर मोरे, गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर, औदयोगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य आर्जुन आहेर, प्रवरा सायन्स अकादमीचे संचालक प्रा. शहाजी साखरे,प्लेसमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट विभागाचे संचालक प्रा.धनंजय आहेर तसेच  विविध शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रम साजरे करण्यात आले.

फोटो कॅप्शन :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती निमित्त लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये इंदिराजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, दिपक विखे  आदी.