तलवारबाजी स्पर्धेमध्ये कु. हर्षदा नाईक या विद्यार्थीनेने व्दितीय क्रमांक

कोकमठाण येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरची कु. हर्षदा नाईक या विद्यार्थीनेने व्दितीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्या सौ. भारती कुंकर यांनी दिली.

कु. हर्षदा नाईक या खेळाडूला आता विभागीय स्पर्धे मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे . विद्यालयाच्या कॅम्पस संचालिका सौ. लीलावती सरोदे क्रीडा संचालिका सौ विद्या गाडे यांचे मार्गदर्शन लाभले .

या विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष ना.  श्री.राधाकृष्ण विखे पाटील, महासंचालक डॉ .यशवंत  थोरात, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा ना. .शालिनीताई विखे पाटील,  खासदार डॉ.सुजय विखे, , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे, टेक्निकल डायरेक्टर डॉ.रेड्डी, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे ,कॅम्पस संचालिका सौ. लीलावती सरोदे    शिक्षकांनी अभिनंदन केले.