‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेद्वारें कु. शांभवी धिरेंद्र शुक्ल या प्रवरा पब्लिक स्कुलची माजी विद्यार्थिनीची अभ्यासक्रमासाठी साठी निवड

प्रवरा पब्लिक स्कुलची माजी विद्यार्थिनी कु. शांभवी धिरेंद्र शुक्ल या विद्यार्थिनीच्या संशोधन कार्याची दखल घेऊन अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने कु.शांभवी हिला मशिन लर्निंग अँड ऑल हॅकाथॉन 2019 या कोर्से साठी निवड केली असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली.

विविध क्षेत्रासंह संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रवरा पब्लिक स्कुल च्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत आता कु. शांभवी धिरेंद्र शुक्ल या विद्यार्थिनीचा समावेश झाला असून,’नासा’ सारख्या अवकाश संशोधन संस्थेमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली असल्याने प्रवरा पब्लिक स्कुलच्या दृष्टीने हि अभिमानाची बाब असल्याचे प्राचार्य शेळके म्हणाले. कु. शांभवी शुक्ला  हिने बंगलूर मध्ये डेटा सायन्टिस म्हणून उत्तम काम केले आहे. तिच्या या दशकातील सरोत्तम काम असल्याने नासा नेतिची निवड केली.

कु. शांभवी शुक्ला या विद्यार्थिनीचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे,  शाळेचे संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.