नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे

 बालवयातील मुलांचा भविष्यातील कल ओळखून तो कल सर्वार्थाने विकसित करण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा या नव्या पिढीचे जीवन घडविणाऱ्या अस्याच असल्याचे सांगताना. तणावमुक्त वातावरण असलेल्या  या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या  क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांना आपल्या सदिच्छा भेटी प्रसंगी दिला.        

अभिनेते सयाजी शिंदे हे साईबाबांच्या दर्शनानिमित्त शिर्डी येथे आले असता त्यांनी श्री अमोल जाधव आणि बाळासाहेब आहेर यांच्या समवेत प्रवरा पब्लिक स्कुलला सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रवरा पब्लिक स्कुलमधील विविध विभागांना त्यांनी भेटी दिल्या. येथील प्रशस्त मैदाने,आणि अत्याधुनिक सुविधांचे त्यांनी कौतुक केले. वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वसतीगृह जीवन अभ्यासासाठी सर्वात आदर्श वातावरण प्रदान करते. विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ आणि योग्य वातावरण मिळते असे सांगताना  तणावमुक्त मनाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.      

प्राचार्य सयाराम शेळके यांनी सयाजी शिंदे यांचा पुष्प गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. या वेळी उपप्राचार्य के.टी अडसूळ,एम ई जोसेफ,सौ. मीना जगधने,सौ. सिमा क्षिरसागर, एस व्ही गोडगे,एस.एस.झोटिंग भाऊसाहेब गटकळ यांचेसह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्तित होते.  

फोटो कॅप्शन :-प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा पब्लिक स्कुल ला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी स्वागत करताना प्राचार्य सयाराम शेळके,उपप्राचार्य के.टी अडसूळ, श्री अमोल जाधव,बाळासाहेब आहेरएम ई जोसेफ,सौ. मीना जगधने,सौ. सिमा क्षिरसागर, एस व्ही गोडगे,एस.एस.झोटिंग भाऊसाहेब गटकळ आदी.