नोकरी आणि उद्योजकतेमध्ये प्रवरा अव्वल…

प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात उद्योग संस्था परिसवांद

लोकनेते पद्माभूषण डाँ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात उद्योग संस्था परिसवांद नुकताच संपन्न झाला. या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी आणि औषधनिर्माण उद्योजकता यावियषी तज्ञांनी मार्गदर्शन केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविदयालयाने विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी साठी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय योजना या उद्देशाने विविध नामांकित कंपनीच्या एच आर व्यवस्थापक मंडळी बरोबर परिसवांद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या परिसवांदासाठी जे. बि. केमिकल्स प्रा. लीचे उपाध्यक्ष मनोज चिटणीस, प्रिझम लाइफ सायन्स संस्थापक संचालक अजय जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील तर प्रमुख अतिथी माजी मंञी श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील हे व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर सिरिम इन्स्टिटयूट चे जनरल मॅनेजर श्री. पंकज ठाकूर, प्रीमियम सिरम चे उपाध्यक्ष श्री. संदीप पाटील, सन फार्मा चे श्री.मीनाकेतन राय, सिप्ला च्या सौ. गीता राय डब्लू. एन. एस च्या सौ. नीता नाशिककर,सौ. श्रद्धा कोकणे, साईटेक फार्मा चे चैतन्य बोरावके, रेव फार्मा. चे रोहित पांडे, सक्सेस्स अकॅडेमि चे श्री. गणेश आव्हाड हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यासभे मुळे महाविद्यालय आणि फार्मा कंपन्या मधील अंतर कमी होऊन विद्यार्थ्यांना नोकरी, संशोधन, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील असे मत सर्व औषधनिर्माण शास्ञ महाविद्यालयाचे संचालक श्री. बी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.
श्री. चिटणीस यांनी फार्मा कंपनीची सध्य परिस्थिती व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा यावर मार्गदर्शन केले तर श्री पंकज ठाकूर यांनी औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील संशोधणातील संधी यावर आपला मत प्रदर्शित केले.
सौ. नाशिककर यांनी औषधनिर्मानशास्त्रतील विविध नवीन नोकरी क्षेत्र यावर विद्यार्थांना संबोधित केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री अजय जोशी यांनी उद्योजक्ता कसा घडतील यांवर प्रकाशझोत टाकला.
विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा भविष्यात नोकरीसाठी होणार आहे.महाविद्यालयात स्वतंत्र ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागंतर्गत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभे साठी एकूण ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. सोमेश्वर मनकर ,माजी विद्यार्थी संघटना प्रमुख सौ. हेमलता भवर, डॉ. संतोष दिघे, डॉ. सुहास सिद्धेश्वर व इतर सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ. सोमेश्वर मनकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य श्री. संजय भवर यांनी केले.