प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी रिंधेची महाराष्ट्राच्या संघात निवड

पन्हाळा (कोल्हापूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय १४ वर्षे वयोगटाच्या शालेय फुटबॉल स्पर्धेतून लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरची विद्यार्थ्यीनी कु. ज्ञानेश्वरी रिंधे हिची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आहे.