प्रवरा फार्मसी लोणी येथेराष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला असल्यावही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

प्रारंभी मेजर ध्यानचंदयांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले, त्या नंतर देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याह स्ते “ फिटइंडियामुवमेंट “ या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण महाविद्यालयात करण्यात आले तसेच त्या अंतर्गत १०,००० पावले (स्टेप) चालण्याचा उपक्रमव १०० मीटर धावण्याची स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आली.

तसेच हॉकी चेजादुगार मेजरध्यानचंद यांच्या जन्म  दिना निमित्त दर वर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अंतर्गत महाविद्यालयात इंटरक्लास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या मध्ये महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांप्रसंगी प्राचार्या डॉ. प्रिया राव आणि विद्यार्थी.