प्रा.सौ.वैशाली खिलारी –घोलप यांना पीएच.डी. पदवी प्रदान

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,प्रवरानगर  येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.सौ.वैशाली खिलारी –घोलप यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना केलेल्या संशोधनाबद्दल पीएच.डी. पदवी प्रदान केली.त्यांना वायल्ड प्लॅंट्सच्या फळांच्या अंशतः कृती आणि पौष्टिक मूल्यांवर  संशोधन केले . 

आपल्या संशोधनामध्ये त्यांनी औरंगाबाद ,अहमदनगर, पुणे, व नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या जंगली फळांचे सर्वेक्षण करून त्यामधील प्रथिने , कर्बोदके, जीवनसत्व क ,प्रती ऑकसीडीकारक तत्व यांचे विश्लेषण करून नेहमी वापरात येणाऱ्या फळाबरोबर तुलना करून जंगली फळांचे महत्व अधोरेखित केले. याविषयीचे त्यांचे संशोधन वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत या संशोधनासाठी त्यांना इंद्रराज आर्ट्स कॉमर्स आणि सायंस महाविद्यालय सिल्लोडचे प्राचार्य डॉ. प्रमोद शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

 त्या हनुमंतगाव तालुका – राहता येथील श्री. सूर्यभान रामकृष्ण घोलप यांच्या स्नुषा असून टाकळी ढोकेश्वर तालुका- पारनेर  येथील  इंजी. विजय खिलारी यांच्या भगिनी आहेत त्यांना प्राचार्य डॉ.आर. के. आहेर ,डॉ. टी.एस. थोपटे ,डॉ.डी.आर.ठुबे ,प्राचार्य एम एस अनाप ,व डॉ.सोमनाथ घोलप यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल अड.शिवाजीराव अनभुले आणि श्री. भागवत बापुजी पा. घोलप यांनी अभिनंदन केले.