फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल ची विजयी सलामी!

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आयोजित व गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर येथे खेळवल्या गेलेल्या जिल्हास्तरीय सतरा वर्षे वयोगटातील फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात आत्मा मलीक स्कूल संघाचा दोन झिरो गोल फरकाने पराभव करत प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला असल्याची माहिती  प्राचार्य सुशील शिंदे यांनी दिली.

या स्पर्धा दिनांक ९ व १० सप्टेंबर २०१९ दरम्यान पार पडल्या. सतरा वर्षे वयोगटात अहमदनगर जिल्ह्यातील ३० संघांनी सहभाग घेतला होता. सेमी फायनलमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचा ३-० गोलने पराभव करुन पीसीपीएस संघाने मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये आत्मा मलिक स्कूलला २-० गोलने धूळ चारत प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल संघाने विजयी सलामी दिली. सदर खेळाडूंना प्रशिक्षक रवींद्र भणगे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी स्पर्धकांचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, शाळेचे डायरेक्टर के जगन्नाथन, उपप्राचार्य हेमांगी कसरेकर, निमसे सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित,गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर येथे खेळवल्या गेलेल्या जिल्हास्तरीय सतरा वर्षे वयोगटातील फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात आत्मा मलीक स्कूल संघाचा दोन झिरो गोल फरकाने पराभव करत विजयी ठरलेला प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा संघ.