राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

लोणी येथील  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली. 

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी प्रा. राहुल विखे यांनी लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र व  त्यांची स्वातंत्र्यासाठीची चळवळ  या विषयी माहिती दिली तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले. 

फोटो कॅप्शन :-लेणी येथील  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक  कु.प्रगती इंगळे हिने सूत्रसंचालन व आभार मानले.