लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील वर्षातील कु. भाग्यश्री कोल्हे या विदयार्थिनीची इंद्रधनुष्य युवक महोत्सव स्पर्ध्येसाठी निवड.

लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील  वर्षातील कु. भाग्यश्री कोल्हे या विदयार्थिनीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे झालेल्या नृत्य ,गायन, स्किट स्पर्ध्ये मध्ये नेत्रदीपक प्रगती केल्याने तिची आता  गोंडवाना विद्यापीठामध्ये होणाऱ्या इंद्रधनुष्य या युवक महोत्सव  स्पर्ध्येसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

गडचिरोली येथील  गोंडवाना विद्यापीठामध्ये २ते ५ डिसेंबर२०१९ या कालावधीमध्ये  होणाऱ्या इंद्रधनुष्य स्पर्ध्येसाठी कु. भाग्यश्री कोल्हे या विदयार्थिनीची निवड झाल्याने संस्थेचे अध्यक्ष आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार डॉ. सुजय  विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, सहसचिव भारत घोगरे,डॉ. हरिभाऊ आहेर. प्रा. दिगंबर खर्डे , कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,आणि प्राध्यापकांनी अभिमानदंन केले.