सुषमा स्वराज यांच्या सारख्याच विद्यार्थिनी घडाव्यात

प्रवरेच्या शाळा आणि महाविद्यालये हे खेड्यात असले तरी, जलद गतीने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर कणखरपणे टिकाव धरू शकतील असे नागरिक घडविण्यासाठी शहारातील सुविधांपेक्षा सरस आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा प्रवरे मध्ये उपलब्ध असल्याने, पाहिजे ते ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे सांगताना. सर्वच बाबतीत कणखर समजल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या सारख्याच  विद्यार्थिनी प्रवरा शैक्षणिक परिवारातून घडाव्यात असी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली. 

प्रवरा शैक्षणिक संकुलातील शैक्षणिनिक सुविधा आणि परिसराची माहिती नवीन विदयार्थी आणि त्यांच्या पालकांनी जाणून घ्यावी. या साठी  प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य यांचा एकत्रित मेळाव्यात सौ. विखे पाटील बोलत होत्या. या प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक भगवंतराव घोलप , अप्पासाहेब दिघे, स्वप्नील निबे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, पतसंस्थेचे चेअरमन डॉ. सतीश तुरकणे,  ट्रेनींग आणि प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी,संगणक विभागाचे प्रा. शरद रोकडे, केमिकल विभागाचे डॉ. रवींद्र गायकवाड,सिव्हिल विभागाचे डॉ. राजेंद्र गायकवाड,माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. सौ.स्वाती राऊत,मॅकेनिकल विभागाचे राजेंद्र खर्डे, इलेक्ट्रिक विभागाच्या सौ.सिमा लव्हाटे , डॉ. चंद्रकांत कडू , रजिस्टार भाऊसाहेब पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम वर्षाचे विद्यार्थी समन्वयक प्रा. लोंढे यांनी या मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले होते. 

 प्रारंभी प्राचार्य  डॉ.संजय गुल्हाने यांनी स्वागत करून अबियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा सांगताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा -महाविद्यालयनमधून सुमारे ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगताना जगातील विविध २२ देशांमध्ये सुमारे १ लाख ४० हजार माजी विदयार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुमारे १८० विदयार्थ्यांना नोकऱ्या प्राप्त झाल्याचे ते म्हणाले . यावेळी मागील शैक्षणिक वर्षांमध्ये टॉपर ठरलेल्या कु. योगिता देशपांडे ,कु. सुजाता शिरसाठ आणि सत्यम डहाळे या विद्यार्थ्यंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या वतीने सुदर्शन भवर,कु. वैष्णवी थोरात,कु. वैष्णवी विश्वासराव या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

 सौ. विखे म्हणाल्याकी, ग्रामीण भागातील मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या साठी  पदमश्री विखे पाटील स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेतील विदयार्थी जागतीक पातळीवर पोहोचले आहेत . बदलत्या तंत्रज्ञाशी समरस होणारे विद्यार्थी घडवील जावेत या साठी निर्माण केलेल्या परिपूर्ण सुविधा निर्माण केल्यानेच हे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या. 

डॉ. अशोक कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रवरेतील नैसर्गिक  वातावरण चांगले असल्याने विदयार्थी आजारीच पडणार नाहीत असी ग्वाही देताना क्वचित विदयार्थी आजारी पडलेच तर  आरोग्याच्या दर्जेदार सुविधाही प्रवरा मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळच उपलब्ध असल्याचे सांगितले . डॉ. कोल्हे म्हाणालेंकी, अपरिहार्य असले तरी,मोबाईलचा कामापुरताच वापर करावा , अभ्यासासाठी ग्रंथालयामध्ये २४ तास इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. 

फोटो कॅप्शन :-प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या विद्यार्थी,  पालक, शिक्षक आणि संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य यांचा एकत्रित मेळाव्यात मार्गदर्शन करताना  सौ. शालिनीताई विखे पाटील ,समवेत जेष्ठ संचालक भगवंतराव घोलप, आप्पासाहेब दिघे, स्वप्नील निबे, डॉ. अशोक कोल्हे, डॉ. सतीश तुरकणे,   प्रा. धनंजय आहेर,  डॉ. विजयकुमार राठी, प्रा. शरद रोकडे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. राजेंद्र गायकवाड,प्रा. सौ.स्वाती राऊत, राजेंद्र खर्डे,  सौ.सिमा लव्हाटे , डॉ. चंद्रकांत कडू ,  भाऊसाहेब पानसरे आदी