मेजर जनरल गजेंद्रसिंग यांची कॅम्पला भेट

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ ऑगस्ट पासून सुरु असलेल्या एन सी सी. ‘थल सैनिक कॅम्प’मध्ये महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ६०० मुलींनी सहभाग घेतला.यातील ४० एन सी सी. छात्रांची दिल्ली येथे होणाऱ्या शिबिरासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली असून नुकतीच महाराष्ट्र एन सी सी प्रमुख मेजर जनरल गजेंद्रसिंग यांनी या कॅम्पला भेट देऊन छात्रांना मार्गदर्शन केले.

औरंगाबाद विभागाचे एन सी सी.ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मोहिते आणि ७ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुपम रंधवा यांनी मेजर जनरल गजेंद्रसिंग यांचे स्वागत केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, पदमश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, रजिस्टर संजय मिसाळ, एन सी सी.ऑफिसर कॅप्टन सुजाता थोरात-देवरे .लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मेजर जनरल गजेंद्रसिंग यांनी या शिवाराची पाहणी करून शिबिरामध्ये सहभागी झालेल्या छात्रांशी संवाद साधला. ग्रामीण भागात असूनही पदमश्री विखे  पाटील महाविद्यालयाने या १६०० मुलींना उपलब्ध केलेल्या सुविधांबद्दल विशेष कौतुक केले.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या एन सी सी. ‘थल सैनिक कॅम्प’मध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ६०० मुलींना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र एन सी सी प्रमुख मेजर जनरल गजेंद्रसिंग, एन सी सी.ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मोहिते, कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुपम रंधवा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, पदमश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, रजिस्टर संजय मिसाळ, एन सी सी.ऑफिसर कॅप्टन सुजाता थोरात-देवरे .लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार आदी.