कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा.

लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ.मौलाना अब्दुल आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, एम.व्ही.पी कृषी महाविद्यालय नाशिक येथील प्रा.एस.एस.अहिरे, के.के.वाघ कृषी महाविद्यालय येथील साहाय्यक प्रा.आर.एम.रौदाळ यांच्या उपस्थित आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.के.डी. काळे यांच्या हस्ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि स्वतंत्र सैनिक डॉ. मौलाना अबुल आझाद यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी रासेयो स्वयंसेवक कु.देवयानी गोंदकर याने आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून कु.देवयानी गोंदकर हिने स्वयंसेवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी  प्रा.सारिका गाढे, प्रा.मनीषा आदिक,प्रा.स्वप्नील नलगे तसेच महाविद्यालयाचे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच रासेयो चे सर्व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु.रुचिका चौधरी हिने केले. तसेच महाविदयलायचे प्रा.अमोल सावंत यांनी आभार मानले.

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय तसेच सिमॅसेस लर्निंग एलएलपी संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता या अभ्यासक्रमाचे नुकतेच लोणी येथे उदघाटन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी म.फु.कृ.वि. राहुरीचे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप क्षीरसागर,संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर , महाविद्यालाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, ,अभ्यासक्रम प्रशिक्षक श्री. सुशांत सांबारे, श्री. अभिषेक सापटे, प्रशिक्षण समन्वयक मालती बनसोडे,कौशल्य विकाससमन्वयक प्रा. प्राची शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यवसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी लोणी येथील कृषी महाविद्यालयाची निवड झाली त्यानुसार दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता या अभ्यासक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

फोटो कॅप्शन :-पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना आणि  छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत लोणी येथील कृषी महाविद्यालयामध्ये  ‘दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता’  अभ्यासक्रमाचे  उदघाटन प्रसंगी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,म.फु.कृ.वि.चे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप क्षीरसागर,प्रा. धनंजय आहेर , प्राचार्य प्रा. निलेश दळे, ,श्री. सुशांत सांबारे, श्री. अभिषेक सापटे,  मालती बनसोडे प्रा. प्राची शिंदे आदि

ग्रंथपालांनी सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथालयाचे महत्व वाढवावे – भारती बॅनर्जी

बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार होत असून  वाचकांना घरबसल्या  इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकणार असल्याने ग्रंथपालांनी सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथालयाचे महत्व वाढवावे असे प्रतिपादन सौ.भारती बॅनर्जी यांनी केले.

लोकनेते पद्मभुषन डॉ.बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.विखे पाटील महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात “आजच्या सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथपालांचे कार्य व ग्रंथालयीन सेवेचे महत्व”  या विषयी सौ.भारती बॅनर्जी यांचे उद्बोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर  होते.  कार्यक्रमाचे प्रास्तावीक ग्रंथपाल डॉ.बाळासाहेब आहेर यांनी केले. या वेळी ग्रंथपाल डॉ .अनिल पवार, श्री.तुरकने  यांनी ग्रंथपालांच्या समस्या मांडल्या,  श्री.बाळासाहेब कोरडे, श्री.आदिनाथ दरंदले, श्री.पोपट आव्हाड ,श्री. लक्ष्मीण पानसरे,सौ. विजया तांबे, सौ.मीरा काकडे श्री.नामदेव पांढरकर आदिसंह  संस्थेच्या विवीध शाखेतील ग्रंथपाल उपस्थीत होते उपस्थीत होते.

” आज अनेक शाळा , महाविद्यालयाच्या  ग्रंथालयातील ग्रंथ संग्रहाचा वापर पुरेशा प्रमाणात वाचक, विद्यार्थी ,शिक्षक  करतांना दिसत नाही ,वाचनाचे फायदे आपल्या सर्वांना ज्ञात असुन सुद्धा आजच्या सोशीयल मेडीयाच्या दुनीयेत ..वाचक वर्ग दुरावत चालला आहे या करीता इ-लायब्ररी चे सभासदत्व प्रत्येक ग्रंथपालांनी ,वाचकांनी व्हावे ,इ-जर्नल चे प्रमाण वाढवा ,मासीकांचा वापर ग्रंथालयात वाढवा,संगणकीकृत अद्यायावत ग्रंथालयीन सेवा वाचकांना ग्रंथपालांनी  दिल्यास निश्चितच ग्रंथालयाचे महत्व वाढेल ,अनेक ग्रंथालयाच्या अडी अडचणी असतात त्या वेळेत सोडवुन घ्या” असे प्रतिपादन सौ.भारती बॅनर्जी यांनी व्यक्त केले., शेवटी आभार ग्रंथपाल श्री उल्हास देव्हारे यांनी मानले.

कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिटयूट ऑफ प्लांटेशन मॅनॅजमेण्ट मध्ये निवड

प्रवरा शिक्षण संस्थेतील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील अंतिम वर्षातील श्रेयस वरंदल, अभिजित मोरे, कृष्णा क्षीरसागर, प्रवीण डोईफोडे या चार विद्यार्थ्यांचे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ प्लांटेशन मॅनॅजमेण्ट बंगलोर येथे पदुत्तर  शिक्षणासाठी निवड झाली. असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली.

या इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी सामाईक परीक्षा हे चारही विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. निवड झालेल्या चारही विद्यार्थ्यांचा  संस्थचे अध्यक्ष ना.  राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय  विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,कृषी व कृषी संलग्न महाविद्यलयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस , या सर्वानी विद्यार्थ्यांचे अभिमानदं केले.

अशोक साहेबराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा कडून शिक्षणशास्त्र विषयात पी.एच. डी.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पदमभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. अशोक साहेबराव कांबळे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद कडून शिक्षणशास्त्र विषयात पी.एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्या सौ. विदया वाजे यांनी दिली.

प्रा.  कांबळे यांनी “बुलढाणा जिल्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये राबविण्यात आलेल्या अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाच्या यशश्वीतेचा अभ्यास” या विषयावर डॉ. कृतिका चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला. या बद्दल  संस्थेचे अध्यक्ष  ना.  राधाकृष्ण विखे पाटील , खासदार सुजय  विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, महासंचालक डॉ. यशवंत  थोरात, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,डॉ. हरिभाऊ आहेर. प्रा. दिगंबर खर्डे  या सर्वानी विद्यार्थ्यांचे अभिमानदं केले.

प्रवरेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता मोहीम

केवळ अट्टल राजकारणीच नाही तर जीवनाच्या विविध पैलूवर चांगलाच प्रभाव असलेल्या महात्मा गांधी यांनी  अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला.असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक स्नेहल सहाणे यांनी केले.

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे आणि रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात स्नेहल सहाणे या विद्यार्थिनीने आपले विचार मांडले. यावेळी डॉ.मधुकर खेतमाळस यांनीही  स्वयंसेवकांना मार्गदर्शनकरून स्वच्छ भारत मिशन राबविण्याचे आवाहन केले. प्रारंभी महाविद्यालयच्या प्रा.श्रद्धा रणपिसे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्वयंसेवक स्नेहल सहाणे हिने सांगितले कि, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा मान देण्यात आला आहे आणि आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आले असे तिने सांगितले तसेच अपर्णा कदम हिने भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.

प्रतिमपूजन झाल्यानंतर रासेयोच्या वतीने प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविले, महाविद्यालय परिसर आणि मुलींचे वसतिगृह गेट परिसर स्वच्छ केला. स्वयंसेवक दीप्ती शेळके हिने स्वच्छते बद्दल स्वयंसेवकांना शपथ दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन वाघ यांनी केले तर स्वयंसेवक प्रतिभा कर्डीले हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्सवात निमित्त राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविताना विदयार्थी 

जलतरण स्पर्ध्ये मध्ये पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुल च्या दहा खेळाडूंनी सुवर्ण, सिल्व्हर आणि कास्य असे ३१ पदक प्राप्त.तर, बॉक्सिंग स्पर्ध्येत १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्येसाठी निवड

अहमदनगर येथिल वाडिया पार्क येथे पार पडलेलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्ध्येमध्ये लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुल च्या दहा खेळाडूंनी सुवर्ण, सिल्व्हर आणि कास्य असे ३१ पदक प्राप्त केली असून पोलीस ब्राऊन मैदानावर झालेल्या  बॉक्सिंग स्पर्ध्ये मध्ये १५ सुवर्ण, ५ सिल्व्हर आणि ३ कास्य पदक मिळवून या स्पर्ध्ये मधील १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्येसाठी निवड झाली  असल्याची माहिती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.

यामध्ये १७ वर्षे वयोगटातील करण धनवट  यांनी अनुक्रमे ५०,१००,२०० मीटर  आणि ४ मी. बाय १००,४ बे मिडले  रिले मध्ये पाच सुवर्ण पदक मिळविले. तर, वैभव तरटे १०० मीटर,४ बाय १००मी. रिले, ४ बे मिडले  रिले मध्ये तीन सुवर्ण पदक आणि अंश पाल या खेळाडूने १०० मी. रॉक,२००मी.बॅक, ४००मी.फ्री, ४ बाय १०० मी. फ्री रिले,४ बाय मोडले रिले असे पाच सुवर्ण पदक तसेच विनायक ठाकरे या विद्यार्थ्याने ४ बाय १०० मी, आणि ४ बाय मिडले मध्ये सुवर्ण आणि ५० मी. मध्ये ब्राँझ पदक मिळविले.तर १४ वर्षे वयोगटातील कुणाल घोंगडे यांनी ५०मी. मध्ये सिल्व्हर पदक मिळविले.

१९ वर्षे वयोगटातील अक्षय गांगुर्डे २००मी,४००,मी. ४बाय १००मी रिले, ४ बाय मिडले,स्पर्ध्येत सुवर्ण आणि सिल्वहर पदक मिळविले. मंगेश काळे याने १००मी. फ्री,५०मी फ्री,४ बाय १००मी रिले,४ बाय मोडले रिले मध्ये सुवर्ण आणि सिल्वहर पदक मिळविले.वैभव सरोदे याने १५०० मी फ्री मध्ये सुवर्ण,१००मी बॅक मध्ये ब्राँझ,४ बाय १०० रिले, ४ बाय मिडले मध्ये सुवर्ण आणि सिल्वहर पदक मिळविले.तर, यश पलांडे या खेळाडूने ४ बाय १०० मी, रिले स्पर्धेत सुवर्ण ४ बे मोडले स्पर्ध्येत सिल्व्हर पदक मिळविले.

पोलीस ग्राउंड येथे पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्ध्ये मध्ये शैलेश महाजन,शैलेश महाजन, निरंजन गांगुर्डे,सिद्ध थोपटे,तेजस पारखे,निहाल सावंत,प्रज्वल पाटील,तपस्वी भांबरे,वेद आजगेकर,शिध्येश ढमढेरे,आदर्श राठोड,मंथन फुरुडे, महेश ससाणे,  प्रथमेश  ठोंबरे यांनी सुवर्णपदक आणि मुंनाल तरडे, प्रेम पिसे,अशिष गुरव ,साहिल मानकर,सुशांत महाले यांनी सिल्व्हर आणि जयदीप दुशिंग,यश बोर्डे,गौरव लोहारे यांनी ब्राँझ पदक मिळविले. यातील १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्येसाठी निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंचे  राज्याचे गृह निर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के  पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,महासंचालक डॉ.यशवंत थोरात,सचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. दिगंबर खर्डे, कमांडण्ट डॉ.भरत कुमार ,प्रा. विजय आहेर यांचेसह शिक्षक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.

चौकट :- पोलीस ग्राउंड येथे पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्ध्ये मध्ये याच विद्यालयाच्या खेळाडूंनी १५ सुवर्ण ५ सिल्व्हर आणि ३ कास्य पदक मिळविले यातील १५ खेळाडूंची विभागीय स्पर्ध्ये साठी निवड झाली आहे.  

फोटो कॅप्शन ;-जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण, सिल्व्हर असे ३१ पदके  मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत कमांडण्ट डॉ.भरत कुमार, प्राचार्य सुधीर मोरे आणि प्रशिक्षक आदी.

प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला आयएसओ मानांकन.

स्थापनेपासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या लोणी येथील  प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला नुकतेच “आयएसओ” मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथिल प्रवरा महाविद्यालयातील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, गुणवत्ता, संशोधन, परिपूर्ण  ग्रंथालय, विध्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वसतिगृहे, द्रुकश्राव्य माध्यमांनी परिपूर्ण वर्ग, अद्यावत जिमखाना, क्रीडासुविधा, अनुभवी  व उच्च शिक्षित शिक्षकवृंद, उज्वल निकालाची परंपरा, उत्कृष्ट प्लेसमेंट, सामाजिक कार्यातील महाविद्यालयाचा सहभाग,विविध संस्थांशी सामंजस्य करार, आदी बाबींचा अभ्यास करून लोणी येथील औषधनिर्माणशास्त्र  महाविद्यालयआय.एस.ओ ९००१:२०१५  क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टिम चे निकष पूर्ण करत असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे,प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे डॉ. राव यांनी सांगितले.

सदर मानंकानाबद्दल राज्याचे गृह निर्माणमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष्या ना. सौ.शालिनीताई विखे पाटील,संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात,रणरागिणी महिला मंडलाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे पाटील, संचालक,तांत्रिक-शिक्षणडॉ. के.टी.व्ही. रेड्डी, यांनी अभिनंदन केले.  

फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिरचा दबदबा .. राज्यस्तरावर निवड

नुकत्याच कोळपेवाडी येथे पार पडलेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या १४ वर्षें वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवून प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या या संघाने फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला असून या संघाची राज्यस्तरावर निवड झाली असल्याची माहिती संचालिका सौ.लीलावती सरोदे यांनी दिली.

विद्यालयाच्या प्राचार्या सौ. कुमकर, क्रीडा संचालिका आणि फुटबॉल कोच सौ. विद्या गाढे-घोरपडे , हॉकी मार्गदर्शक सौ. कल्पना कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गोलकिपर कु. भावना देशमुख,कु, दीप्ती बर्डे,कु. वैष्णवी काळे,कु. ईश्वरी नरवडे, यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच कु. निकिता जाधव,कु. गायत्री बोरुडे, कु. युतिका अहिरे,कु. प्रणिता पगार, कु.तेजल  उचित, कु.श्रद्धा मुंढे,कु. ऋतुजा सिनारे, कु. मयुरी लेकुळे, कु. श्रुती पाटील,समृद्धी जंगले,कु. पायल काळखैरे,सरिता आंधळे, तनुजा अहिरे,वैष्णवी मोरे यांच्या संघाने सेमीफायनल मध्ये सोलापूर ग्रामीण संघाचा ५X ० ने पराभव  करीत अंतिम सामन्यात पुणे शहराच्या सेंट मेरी संघाबरोबर अटीतटीची लढत देऊन २X० ने पुणे संघावर विजय मिळविला.

या मुलींचे राज्याचे गृह निर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के  पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,महासंचालक डॉ.यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. दिगंबर खर्डे, प्रा. विजय आहेर यांचेसह शिक्षक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन ;-विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रप्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या संघासोबत संचालिका सौ.लीलावती सरोदे प्राचार्या सौ. कुमकर, क्रीडा संचालिका आणि फुटबॉल कोच सौ. विद्या गाढे-घोरपडे , हॉकी मार्गदर्शक सौ. कल्पना कडू आदी.

सौ धनश्रीताई विखे पाटील-बातमी

भारताची चाळीस टक्के लोकसंख्या ही युवा असून या युवा शक्तीचा उपयोग भारत देशाच्या कल्याणासाठी व्हायचा असेल तर तो युवावर्ग सुदृढ असला पाहिजे म्हणूनच किशोरावस्थे मध्येच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळून आपले स्वास्थ्य जपावे असे प्रतिपादन ब्रिलियनबर्ड स्कुलच्या  संचालिका सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पदमभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून सौ  धनश्रीताई विखे पाटीलबोलत होत्या.या प्रसंगी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे,  कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी  तसेच कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

सौ  धनश्रीताईंनी विखे पाटील यांनी प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतात सर्वाधिक दुर्लक्षित असलेला महिलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठयाप्रमाणात असून,साधारणतः बालव्यामध्ये भातुकलीच्या खेळात आघाडीवर असलेल्या मुली शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये संधी आणि सुविधा असूनही खेळाकडे दुर्लक्ष करतात.असे सांगताना परिवार आणि समाजामध्ये महिलेने सुदृढ राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी युवादशेमध्येच मुलींनी मैदानी खेळ खेळून आपले स्वास्थ्य जपताना शरीर सुदृढ व निरोगी ठेवले पाहिजे.मुलींनी आपल्या अभ्यासाबरोबच खेळात चांगल्याप्रकारे सहभाग घेतला पाहिजे व आपल्या देशाचे  तसेच आपल्या संस्थेचे नाव उंचावले पाहिजे,असे सांगताना केंद्र सरकारद्वारे सुदृढ भारत अभियान अंतर्गत असलेल्या वातावरणाची शुद्धता, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत योजना, परिसर स्वच्छता, माझी कन्या भाग्यश्री योजना इत्यादी मुद्द्यांचा सविस्तर उहापोह करताना. असे त्या म्हणाल्या. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सौ  धनश्रीताई विखे पाटील समवेत संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर आदी.

‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेद्वारें कु. शांभवी धिरेंद्र शुक्ल या प्रवरा पब्लिक स्कुलची माजी विद्यार्थिनीची अभ्यासक्रमासाठी साठी निवड

प्रवरा पब्लिक स्कुलची माजी विद्यार्थिनी कु. शांभवी धिरेंद्र शुक्ल या विद्यार्थिनीच्या संशोधन कार्याची दखल घेऊन अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने कु.शांभवी हिला मशिन लर्निंग अँड ऑल हॅकाथॉन 2019 या कोर्से साठी निवड केली असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली.

विविध क्षेत्रासंह संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रवरा पब्लिक स्कुल च्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत आता कु. शांभवी धिरेंद्र शुक्ल या विद्यार्थिनीचा समावेश झाला असून,’नासा’ सारख्या अवकाश संशोधन संस्थेमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली असल्याने प्रवरा पब्लिक स्कुलच्या दृष्टीने हि अभिमानाची बाब असल्याचे प्राचार्य शेळके म्हणाले. कु. शांभवी शुक्ला  हिने बंगलूर मध्ये डेटा सायन्टिस म्हणून उत्तम काम केले आहे. तिच्या या दशकातील सरोत्तम काम असल्याने नासा नेतिची निवड केली.

कु. शांभवी शुक्ला या विद्यार्थिनीचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे,  शाळेचे संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एपीजी लर्निंग पुणे यांच्या तर्फे सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण

कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ,  लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि  सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्रवरेच्या कृषी  जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एपीजी लर्निंग पुणे यांच्या तर्फे सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण देण्यात आले  असल्याची  माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यावसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची निवड झाली असल्याचे  प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी सांगितले.

या कोर्ससाठी श्री.अंकित माहेश्वरी प्रोजेक्ट हेड सिमॅसेस पुणे, श्री.अमोल बिरारी मॅनेजर सकाळ ग्रुप आणि श्री.दिलीप क्षिरसागर स्किल डेव्हलेपमेंट समन्वयक म.फु.कृ.वि. राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे.तसेच या करारासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, स्किल डेव्हलपमेंट समन्वयक प्रा.स्वप्नील नलगे तसेच प्रा.अमोल सावंत यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.

दोन महिन्याचे प्रशिक्षण हे निशुल्क असून, पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, भारत सरकार यांचे द्वारे प्रमाणपत्र असून रोजगार मिळण्यापर्यंत मदत केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ऍग्री पॉलिटेक्निक डिप्लोमा / ऍग्री टेक्निकल स्कुल सर्टिफिकेट / १२ वी (विज्ञान पास) याना प्राधान्य दिले जाणार आहे.  त्याच अनुषंगाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी मध्ये या प्रशिक्षणाला सुरुवात येत्या १५ सप्टेंबर पासून सुरवात झाली आहे.यामध्ये कृषी विस्तार सेवा प्रदाता (अग्री एक्सटेंशन ऑफिसर) आणि दुग्ध उत्पादक/उद्योजक (डेरी फार्मर/इंटरप्रेणुर) या दोन विषयाचा समावेश करण्यात आला असल्याचे  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामधील प्रशिक्षण समन्वयक श्री.ऋषिकेश तांबे यांनी सांगितले

या कराराबद्दल राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,युवा नेते खासदार सुजय विखे पाटिल,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, सहसचिव श्री.भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, अतांत्रिक विभागाचे प्रा.दिगंबर खर्डे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक विभागाचे संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर आदिंनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एपीजी लर्निंग पुणे यांच्या तर्फे सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण प्रसंगी  विद्यार्थ्यांसमवेत एपीजी लर्निंग चे प्रशिक्षक श्री. विनायक घावले व श्री. भालचंद्र देशपांडे, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. महेश चंद्रे.आदी.